Wednesday, September 17, 2008

माझा कविता संग्रह.

♥♥♥ अमोल भारंबे - माझ्या कविता / चारोळ्या ♥♥♥

() तुझ्या श्वासात ....!!!

तुझ्या श्वासात आहेत
आठवणी आपल्या प्रेमाच्या...
नाते हे अतूट आपले
रेशीमगाठी जणू सात जन्माच्या...!!!


--------------------------------------------------------- © अमोल भारंबे. (२००८)

๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑
๑۩๑๑۩๑■═══ჯჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■๑۩๑๑۩๑


(२) आहेस तू......!!!

आहेस तू सावरायला
म्हणून पडायला ही आवडतं ..................

आहेस तू मनवायला
म्हणून रुसायला ही आवडतं ...................

आहेस तू रडायला
म्हणून रडायला ही आवडतं .................

आहेस तू समजून घ्यायला
म्हणून चुकायलाही आवडतं ...................

आहेस तू पाहायला
म्हणून सजायला ही आवडतं ...................

आहेस तू ऐकायला
म्हणून बोलायलाही आवडतं ....................

आहेस तू सोबतीला
म्हणूनच जगायलाही आवडतं ................... !!!

--------------------------------------------------------- © अमोल भारंबे. (२००७)

๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑
๑۩๑๑۩๑■═══ჯჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■๑۩๑๑۩๑


()
घरसंसार - माझी कविता !!!

घर हे दोघांच असतं,
ते दोघांनीच सावरायचं असतं,
एकाने पसरवलं,
तर दुस~याने आवरायचं असतं;
एकाने पाडलं,
तर दुस~याने उभारायचं असतं;
एकाने तोडलं,
तर दुस~याने जोडायचं असतं.....!!!

या साठी गरज असते,
ती दोघांच्या एक-मताची,
"त्या" दोघांच्या एकतेची,
दोघांनी एकमेकांना सांभाळण्याची,
दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची,
मांडलेल्या संसारात,
प्रामाणिकपणे दोघांची मने रमण्याची....!!!

दोघांची मने रमली,
तर पसरलेल्या घरालाही
लवकरच आकार मिळतो;
अन्यथा, चांगल्यातला चांगला संसारही
अधिकच विखुरतो....!!!

म्हणूनच म्हणतो -
"रमाचे मन रमले नाही,
तर रामाने मन रमवावं,
आणि जर रामाचे मन रमले नाही,
तर रमाने मन रमवावं "...!!!

एखाद्यावेळेस यातूनच,
दोघांची मने पुन्हा जुळतातहि,
दोघे एकमेकांना मिळतातहि,
कोलमडलेल्या घराला,
छानसा नवीन आकार येतो
आणि
आनंदाने भरलेल्या संसाराचा
नव्याने उदय होतो....!!!

कदाचित म्हणूनच असं म्हणतात की -
"ईमारत बांधायला वेळ लागतो असं नाही,
घर बांधायला वेळ लागतो;
घरासाठी दोन जीवांचा,
खराखुरा मेळ लागतो "....!!!

--------------------------------------------------------- © अमोल भारंबे. (१९९९)

๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑๑۩๑
๑۩๑
๑۩๑๑۩๑■═══ჯჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■═══ჯહઔહჯ═══■๑۩๑๑۩๑



My Paintings